||हा रंग, ही पॅलेट, हा ब्रश....
किती ताकद आहे ह्या अस्त्रात!||
||होय अस्त्रच म्हणता येईल...
फक्त स्वत:वर वापरायचे अस्त्र!||
||अपलीच मरगळ, लोभ, मत्सर ,
अहं ,मी, आणि माझं..च्या कवचाला
छेदुन काढणारं अस्त्र||
||आणि छेदताच...प्रकटतात नवीन किरण,
आतुन उसळी मारुन मोठ्ठी ऊडी घ्यायला||
||दडलेले, आसुसलेले, धगधगते किरण,
उफाळुन स्वत:ला व्यक्त होण्यास आतुर झालेले!||
||एकाच झेपेत माणसाला नव्या विश्वात नेऊन,
ठेवतात हे सामर्थ्य ऊराशी बाळगुन!||
||एकच झेप, आणि मिळाला अथांग सागर,
कृतज्ञतेच्या अश्रुंना फुटला पाझर||
||ह्यांना गरज आहे फक्त एका प्रयत्नाची,
माझ्यातला "मी" विसर्जन करायची||
अमेय
4 comments:
Good to see your first blog post Ameya.Thoughtful writing.Keep it up.
Waiting for much more :)
Nice !
good work !
Waa...aprateem
Ameya, very nice piece of poetry and a especially a sentence 'pryatna, mazyatla mi visarjan karaycha'.
Superb Ameya, very good blog post. I will see it regularly.
Sunit Kulkarni
Post a Comment