।। ताशा च्या तालावर, सर्व रूळावर धावणारे
स्वतः झुकून, इतरांना सावर म्हणत येणारे।।
।।सरतांना आयुष्याचे मौल्यवान क्षण
त्या क्षणांच्या आस्वादाची झाली विसरण।।
।।आपण बरे आणि आपला क्षेत्रफळ बरा
कशाला माणुसकीच्या नसत्या ऊठाठेवा।।
।।कोणितरी येईल आणि कोणितरी जाईल
स्वार्थाचीच फक्त इथं मजल टिकून राहिल।।
।।आपुलकी पण वाहते तिची वेळ पाहून
तिची वेळ होताच आटते ओहटी लागून।।
।।काय रे देवा, सर्व अल्प संतुष्टात झुकलेले
"मुक्त हस्त" च्या आनंदाला मुकलेले।।
~अमेय
No comments:
Post a Comment